Top News

Ballarpur Credit Society Election 2026 : बल्हारशाह नगर परिषद एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड




बल्हारशाह नगर परिषद एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, नोंदणी क्रमांक ८२९, यांच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया मंगळवारी, ११ ऑगस्ट रोजी सोसायटीच्या कार्यालयात पार पडली. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मानद सचिव या तीन पदांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

शब्बीर अली, स्वच्छता निरीक्षक, नगर परिषद बल्लारपूर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. संगीता गजानन उमरे, उपमुख्य अधिकारी, नगर परिषद बल्हारशाह यांची मानद सचिवपदी, तर नरेश गेडाम, स्वच्छता निरीक्षक यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक प्रक्रिया सोसायटीच्या कार्यालयात नियमानुसार पार पडली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संचालक मंडळातील तेजबहादूर थापा, मल्लेश कुपलवार, अब्दुल रशीद, प्रशांत बटघरे, शंकर तांड्रा आणि रीना दीपक पंडित यांनी विशेष प्रयत्न केले.

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकारी पानाते, सहाय्यक AR कार्यालय, बल्हारशाह यांनी सांभाळली. तसेच येवले, लिपिक आणि महेश बासनवार यांनी निवडणूक प्रक्रियेस सहकार्य केले.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे संचालक मंडळ व सभासदांकडून अभिनंदन करण्यात आले. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post Next Post