कळमना येथे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या टिमचे भारुड सादरीकरण ; सामाजिक सलोख्याचा प्रभावी संदेश.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ; कळमना भूषण पुरस्कार प्रदान.
चंद्रपूर / राजुरा |मनोज श्रीहरी गोरे - उपजिल्हा प्रतिनिधी - मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत आदर्श स्मार्ट ग्राम कळमना येथे सामाजिक प्रबोधन व सांस्कृतिक सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई व त्यांच्या सहकाऱ्यांनी संत एकनाथ महाराज यांनी रचलेल्या भारुडाचे सादरीकरण करून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला.
स्वच्छ, सुंदर व डिजिटल मॉडर्न ग्राम म्हणून ओळख असलेल्या कळमना गावात २६ जानेवारी २०२६ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे सचिव अविनाश जाधव यांच्या हस्ते व सह-उद्घाटक म्हणून उमेश दादा पारखी (उत्कृष्ट कवी, लेखक व सल्लागार, नाते आपुलकी संस्था, राजुरा) यांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमास विनोद विर विलास झटटे (साधा माणूस फेम, विदर्भ रील स्टार), डॉ. संभाजी वारकड (प्राचार्य, शिवाजी महाविद्यालय, राजुरा), बाळकृष्ण पिंगे (पोलीस पाटील), निलेश वाढई (तंटामुक्ती अध्यक्ष), प्रशांत ताजने (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), सुधाकर लोहे (मुख्याध्यापक) प्रभाकर साळवे अध्यक्ष हनुमान मंदिर कमेटी कळमना, कवडु पा गौरकार अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय कळमना महादेव ताजने अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ कळमना साईनाथ पिपळशेडे सदस्य ग्रामपंचायत कळमना मंगेश ताजने माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉🏻👉🏻Big Breaking : आणखी एक विमान दुर्घटना; आकाशातून मृत्यूचे सावट, खासदारासह 15 जणांचा दुर्दैवी अंत
कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा मान्यवरांना कळमना भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उमेश दादा पारखी यांनी कळमना गावासाठी मोफत वेबसाईट तयार करून देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयास पुस्तक भेट दिल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले. तसेच विनोद विर विलास झटटे यांनी कळमना गावाची सकारात्मक ओळख महाराष्ट्रभर पोहोचविण्यात दिलेल्या योगदानाबद्दल व वाचनालयास पुस्तक भेट दिल्याबद्दल त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. नत्थुजी बोबडे (५० वर्षांची वैद्यकीय सेवा), दयानंद पाटील कोरागे (ग्रामपंचायतीस जमीनदान), डॉ. मारोती सखाराम बल्की (सामाजिक सेवा) व डॉ. राजेश गिरसावळे (नवीन वैद्यकीय सेवा) यांचाही गौरव करण्यात आला.
या सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा कळमना येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विशेष बाब म्हणजे आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे व निलेश वाढई यांनी स्त्री पात्र साकारत संत एकनाथ महाराजांचे भारुड सादर केले. सामाजिक संदेश देणारा हा प्रयोग अभिनव व प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण पिंगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिलीप निमकर सर यांनी केले. शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षक व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत एकनाथ महाराजांच्या भारुडातून सामाजिक व ईश्वरीय कार्य करण्याची संधी मिळाली. या संतवाङ्मयाच्या उपदेशातून आदर्श कळमना गावाची शाश्वत प्रगती व्हावी, हीच खरी प्रार्थना आहे. तसेच समाजासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांना कळमना भूषण पुरस्कार देऊन सन्मान करता आला, हे माझे भाग्य आहे. -
- नंदकिशोर वाढई
आदर्श सरपंच, कळमना.
