राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
नागभीड : राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने संस्थेचे संचालक मयुर किशोरभाऊ वनमाळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहनानंतर झेंडागीत सादर करण्यात आले तसेच नवखळा परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास धनंजय वनमाळी, सदस्य, महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, आरमोरी, हरिश्चंद्र बोंदरे, कोषाध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, आरमोरी, सुलेमान धम्मानी, प्रतिष्ठित व्यापारी, नागभीड, देवेंद्र राहूड व अक्षय वनमाळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राचार्य प्रचल ढोक यांनी केले, तर परेड व्यवस्थेची जबाबदारी प्राध्यापक किशोर बोरकर यांनी पार पाडली.
प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने गोंडवाना विद्यापीठातून विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत प्रथम क्रमांक मिळवून भौतिकशास्त्र विषयात सुवर्णपदक प्राप्त करणारी विद्यार्थिनी राबिया रियाज जादा हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
