Top News

रा. म. गांधी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

रा. म. गांधी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त आदरांजली


नागभीड : राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले तसेच त्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांनी सांगितले की, सत्य, अहिंसा, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये अंगीकारून कायद्याच्या चौकटीत आपली कर्तव्ये पार पाडली, तर जीवन अधिक सुखकर व समृद्ध होते. महात्मा गांधी यांचे विचार आजच्या समाजासाठीही तितकेच मोलाचे व प्रेरणादायी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

संपूर्ण कार्यक्रम शांत, गंभीर व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Previous Post Next Post