Top News

राष्ट्रवादी ला मोठा धक्का : अजितदादांनंतर राष्ट्रवादीने आणखी एक शिलेदार गमावला, शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याचे निधन

राष्ट्रवादी ला मोठा धक्का : अजितदादांनंतर राष्ट्रवादीने आणखी एक शिलेदार गमावला, शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याचे निधन


मान कापली तरी पवार साहेबांना सोडणार नाही, असं म्हणणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याचे निधन




पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून पवार कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते मंडळी, कार्यकर्ते अद्याप सावरलेले नाही. अशातच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका शिलेदाराचं निधन झाल्याचं धक्कादायक वृत्त आलेलं आहे. पुणे शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले.

शांतीलाल सुरतवाला यांनी वयाच्या 76 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते कॅन्सर या गंभीर आजाराशी झुंज देत होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

कोण होते शांतीलाल सुरतवाला?

शांतीलाल सुरतवाला यांनी १९९२ ते १९९३ या कालावधीत पुण्याचे महापौरपद भूषवले आहे. शांतीलाल सुरतवाला हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. काँग्रेस मध्ये असताना पुण्यातील शरद पवार गटाचे नेतृत्व त्यांनी केले. मान कापली तरी पवार साहेबांना सोडणार नाही, असं ते म्हणायचे.

पुढे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर ते शरद पवारांसोबत राहिले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष देखील होते. गेल्या काही काळापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते राजकीयदृष्ट्या फारसे सक्रिय नव्हते.

Previous Post Next Post