Top News

सिंदेवाहीत 60KW EV चार्जिंग स्टेशन सुरू ; इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठा दिलासा

सिंदेवाहीत 60KW EV चार्जिंग स्टेशन सुरू ; इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठा दिलासा


सिंदेवाही : पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी सिंदेवाही शहरात अत्याधुनिक 60KW क्षमतेचे EV e-Charge स्टेशन सुरू करण्यात आले आहे. IndianOil संलग्न आदित्य सर्वो इंडियन ऑइल पंप येथे उभारण्यात आलेले हे चार्जिंग स्टेशन केंद्र सरकारच्या FAME India योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले आहे.

भाजप नेत्याच्या पीएची सिनेस्टाईल हत्या....

उद्घाटन प्रसंगी पंपाचे डायरेक्टर गणेश गोलपल्लीवार, लोड्डेल्लीवार, माजी नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, स्वामी गोलपल्लीवार तसेच इतर मान्यवर आणि पंप व्यवस्थापनाचे पदाधिकारी उपस्थित होते. पारंपरिक पूजा करून स्टेशनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमाचे स्वागत केले.

भाजप नेत्याच्या पीएची सिनेस्टाईल हत्या....

या ठिकाणी बसविण्यात आलेला 60KW DC फास्ट चार्जर इलेक्ट्रिक कार आणि दुचाकी वाहनांना अवघ्या 30 ते 40 मिनिटांत सुमारे 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यास सक्षम आहे. त्यामुळे सिंदेवाही आणि परिसरातील EV वाहनधारकांना आता लांबच्या प्रवासासाठी अधिक सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार आहे.

भाजप नेत्याच्या पीएची सिनेस्टाईल हत्या....

पेट्रोल-डिझेलसोबतच इलेक्ट्रिक वाहनांसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या दिशेने IndianOil कंपनीने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या सुविधेमुळे इंधन खर्चात बचत होण्यास मदत होणार असून पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे.

Previous Post Next Post