नागभिड येथे भव्य सत्संग सोहळा संपन्न; धर्म, संस्कार आणि समाजएकतेचा संदेश
नागभिड : नागभिड येथे काल, दि. 29 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता राम मंदिर नागभीड येथे भव्य सत्संग सोहळा पार पडला. सत्संगात धिरेन्द्र गोपाल सरस्वती यांनी उपस्थित भाविकांना धर्म, संस्कार, नैतिक मूल्ये आणि समाजएकतेचे महत्त्व प्रभावी शब्दांत सांगितले. सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत अध्यात्म आणि संस्कार यांची गरज अधिक वाढल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सत्संग सोहळ्यास विविध धार्मिक, सामाजिक व संघटनात्मक पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला अभिषेक जयस्वाल (अध्यक्ष, विश्व हिंदू परिषद, नागभिड), शुभम सुरपाम (प्रमुख, बजरंग दल), स्नेहा कुर्झेकर (मातृशक्ती प्रमुख), साक्षी पिसे (दुर्गावाहिनी प्रमुख), विनय पिसे (सहप्रमुख, बजरंग दल), ओमप्रकाश मेश्राम (गोरक्षण प्रमुख), अशोक पिसे (सत्संग प्रमुख, विश्व हिंदू परिषद, नागभिड) तसेच पुष्पा जयस्वाल (अथर्वशीर्ष पाठ संयोजिका) उपस्थित होते.
मोरेश्वर येरणे (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तालुका सहकार्यवाहक), राजू येरणे, नरेंद्रस्वामी महाराज (नागभिड संप्रदाय प्रमुख) यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ओम जांभुळकर, आशुतोष, गुलाब, अतुल डोळस, मंगेश कुर्झेकर, अशोक कुर्झेकर, शुभम येरणे, पवन नागरे, यश देवलकर, पंकज गरफडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सत्संगात महिलांचा सहभागही लक्षणीय ठरला; स्नेहा कुर्झेकर, जयश्री गरफडे, उर्मिला अमृतकर, शालू पिसे, कुमुदा पिसे, स्वरा कुर्झेकर, वाघे काकू, सातपैसे काकू यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
संपूर्ण कार्यक्रम शांततामय, भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला आणि उपस्थित भाविकांमध्ये आध्यात्मिक जागृती निर्माण झाली.
