Top News

श्री वासवी कन्यका माता परमेश्वरी देवीच्या भव्य पालखी ने भद्रावती नगरी दुमदुमली

 श्री वासवी कन्यका माता परमेश्वरी देवीच्या भव्य पालखी ने भद्रावती नगरी दुमदुमली


भद्रावती | तालुका प्रतिनिधी - सुनील दैदावार :  भद्रावती ऐतिहासिक नगरीतील श्री कन्यका नगरी मधील श्री वासवी कन्यका माता परमेश्वरी देवस्थान येथे दिनांक 28 जानेवारी 2026 रोज बुधवारला श्री वासवी कन्यका माता परमेश्वरी मुर्ती व्दितीय स्थापना दिवसा निमीत्य काढण्यात आलेल्या श्री वासवी कन्यका माता परमेश्वरी देवीच्या भव्य पालखी मिरवणुकीने भद्रावती नगरी दुमदुमली. सांयकाळी 7 वाजता कन्यका नगरी मधील श्री वासवी कन्यका माता परमेश्वरी देवस्थान येथुन श्री वासवी कन्यका माता परमेश्वरी देवी च्या पालखी चे पुजन करून कलश धारी महिला, महिला लेझीम पथक, भजन, दिंडी, डीझे सह निघाले ली पालखी सुरक्षा नगर, जिल्हा परिषद स्कुल, भद्रनाग मंदिर, साने गुरुजी, दत्त मंदिर मार्गाने पालखी काढण्यात आली. 


👉🏻👉🏻Big Breaking : आणखी एक विमान दुर्घटना; आकाशातून मृत्यूचे सावट, खासदारासह 15 जणांचा दुर्दैवी अंत 

यावेळी चौका चौकात आर्य वैश्य महिलांनी डिझेवर लेझीम नृत्य सादर केले. पालखी मध्ये निलेश गुंडावार, सुधीर गुंडावार, राजेश गुंडावार, समीर उपलंचिवार, प्रकाश पामपट्टीवार, प्रकाश आईंचवार, अतुल गुंडावार, रविकांत उपगंन्लावार, संदिप उपलंचिवार, रितेश उपलंचिवार,सुरज गुंडावार, महेश बोटुवार, सुनिल गुंडावार, अनिल कोडगीरवार, पंकज भास्करवार, किशोर गुंडावार, आनंद वरगंटिवार, उज्वल उपगन्लावार, निखिल गुंडावार, नालमवार, रवि गुंडावार, संजय पदमावार, विवेक सुरावार, यांच्या सह आर्य वैश्य महिला मंडळ, आर्य वैश्य युवक व युवती मोठ्या संख्येत उपस्थीत होते तत्तपुर्वी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले होते यात सकाळी 7.30 वाजता मुर्ती अभिषेक,कुमकुम पूजा, 5 कुंडिय गायत्री यज्ञ, दीप यज्ञ,अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Previous Post Next Post