Top News

भद्रावती तालुक्यातील पिरली येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड 4 आरोपीला अटक 4.29 लाखांचा मुद्देमाल जप्त

 भद्रावती तालुक्यातील पिरली येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड 4 आरोपीला अटक 4.29 लाखांचा मुद्देमाल जप्त 



भद्रावती | तालुका प्रतिनिधी - सुनील दैदावार : भद्रावती तालुक्यातील पिरली शिवारात दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी पोलीसांनी जगार अड्यावर धाड टाकुन चार आरोपीस करून 4 लाख 29 हजाराचा मुद्दे माल जप्त केला. पोलीस विभागास मुखबीरा मार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार मौजा पिरली, ता. भद्रावती येथे काही इसम 52 तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हार–जीतचा जुगार खेळत असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी तात्काळ पंच व पोलिस स्टाफसह घटनास्थळी जाऊन सापळा रचत धाड टाकली धाडीत जुगार खेळत असलेल्या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यात घनश्याम शेषराव उताने (वय 50, रा. मांगली), दीपक नथ्थूजी बोथले (वय 33, रा. वाघेडा), मारोती उर्फ नंदकिशोर महादेव झाडे (वय 42, रा. पिरली) व हनुमान ज्ञानेश्वर देठे (वय 35, रा. पिरली), असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपींच्या अंगझडतीतून व घटनास्थळावरून एकूण 4,29,510 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

👉🏻👉🏻Big Breaking : आणखी एक विमान दुर्घटना; आकाशातून मृत्यूचे सावट, खासदारासह 15 जणांचा दुर्दैवी अंत 

 यामध्ये आरोपींकडून रोख 3,160 रुपये, डावावरची 1,250 रुपये रोख रक्कम, घटनास्थळावरून 06 मोटारसायकली (किंमत अंदाजे 4,25,000 रुपये) तसेच 52 तास पत्ते (किंमत 100 रुपये) यांचा समावेश आहे. या प्रकरणी आरोपी क्रमांक 1 ते 4 तसेच फरार वाहन चालक आरोपी क्रमांक 3 ते 7 विरुद्ध पोलीस स्टेशन भद्रावती येथे अप. क्र. /26, कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत गुन्हे शोध पथकातील ग्रेड पो.उपनि. गजानन तुपकर, सफौ. महेंद्र बेसरकर, पो.हवा. अनुप आस्टूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, गोपाल आतकूलवार, पो.अं. खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड तसेच भद्रावती पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

Previous Post Next Post