नागभीड तालुक्यात निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला पुन्हा खिंडार!
आमदार बंटी भांगडिया यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून बाळापूर (बूज) येथील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश...
नागभीड (ता. ७ नोव्हेंबर) नागभीड तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वाढत्या जनाधाराला आणखी बळ मिळाले असून, काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. बाळापूर (बूज) गावातील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते गणेश भानारकर यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपाचे माजी आमदार ऍड. संजय धोटे यांच्या प्रमुख उपस्थितित आणि
आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमाला जी. प. माजी सदस्य संजय गजपुरे, नागभीड मंडळ अध्यक्ष संतोश रडके, कृ. उ. बा. सभापती अवेश पठाण, चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, माजी प्राचार्य अमीर धम्मानी सर,अजय काबरा, एड. रवींद्र चौधरी, माजी बांधकाम सभापती न. प. नागभीड सचिन आकुलवार, नागभीड तालुका महिला मोर्चा अध्यक्ष श्रीमती इंदु आंबोरकर, प्रा. लोमेश दुधे, जहांगीर कुरेशी यांची उपस्थिती होती. तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी गणेश भानारकर यांनी सांगितले की, “आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रामाणिक, लोकाभिमुख व विकासाभिमुख कार्यशैलीने आम्हाला प्रभावित केले. गावाच्या प्रगतीसाठी ठोस पावले उचलणाऱ्या नेत्यांसोबत काम करण्याची आमची इच्छा असल्याने आम्ही भाजपात प्रवेश करत आहोत.”
नव्या प्रवेशकांना पक्षाच्या वतीने माजी आमदार एड. संजय धोटे यांच्या हस्ते पार्टीचा दुपट्टा परिधान करून स्वागत करण्यात आले. या वेळी उपस्थित नेत्यांनी या प्रवेशामुळे बाळापूर (बूज) परिसरात भाजप अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
माजी आमदार ऍड. संजय धोटे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले, “भाजप हा फक्त राजकीय पक्ष नाही, तर विकासाचे आणि जनसेवेचे व्यासपीठ आहे. आमदार बंटीभाऊ भांगडिया हे सर्वांना सोबत घेऊन नागभीड तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यात अग्रेसर आहेत.विदर्भात सर्वाधिक विकास कामे खेचून आणारा आमदार म्हणून त्यांची ख्याती असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमुद केले.
या प्रवेशामुळे स्थानिक राजकीय समीकरणात चांगलाच बदल घडून येणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. नागभीड तालुक्यात काँग्रेसची पकड दिवसेंदिवस सैल होत चालली असून, भाजपचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. येत्या स्थानीक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुकीत भाजपा ला मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकतो.
