Top News

मिशन २०२७ : विदर्भ राज्य मिळवूनच राहू - ऍड. वामनराव चटप

मिशन २०२७ : विदर्भ राज्य मिळवूनच राहू - ऍड. वामनराव चटप 


स्वतंत्र विदर्भासाठी अंतिम लढ्याची घोषणा


विदर्भ राज्य आंदोलन समितीचा संकल्प – २०२७ पर्यंत स्वतंत्र राज्य


नागपूर | विदर्भ राज्य आंदोलन समितीने केंद्र सरकारने घटनेतील कलम-३ प्रमाणे तात्काळ स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याची मागणी पुन्हा जोरदारपणे मांडली. नागपूर येथील संविधान चौकात क्रांतीदिनानिमित्त आयोजित निदर्शनांत, महाराष्ट्रवादी और विदर्भविरोधी चले जाव अशा घोषणा देत, मिशन २०२७ अंतर्गत विदर्भ राज्य मिळविण्याचा संकल्प करण्यात आला.

राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

  • महाराष्ट्राचे महसुली उत्पन्न : ₹५,६०,९६३ कोटी
  • वार्षिक तूट : ₹४५,००० कोटी
  • विद्यमान कर्ज : ₹७,८२,००० कोटी
  • नव्याने घेतलेले कर्ज : ₹१३,००० कोटी
  • सप्टेंबरअखेर एकूण कर्ज : ₹९,८३,७२७ कोटी


महाराष्ट्र देशातील नंबर १ कर्जबाजारी राज्य ठरले असून, त्यामुळे विदर्भातील सिंचन, उद्योग आणि विकासाची कामे ठप्प झाली आहेत.

सिंचन प्रकल्पांची दुर्दशा

विदर्भातील ₹६०,००० कोटींचा सिंचन अनुशेष आजही अपूर्ण.

बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव-टाकळी धरण ३० वर्षांपूर्वी ₹६९९ कोटींमध्ये मंजूर; आज किंमत ₹३४,९२६ कोटींवर, तरीही ३८% भूसंपादन बाकी.

शेतकरी आत्महत्या व कुपोषण कायम

सिंचन व रोजगारअभावी शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बेरोजगारी व नक्षलवादाचा धोका वाढत असून, सरकारकडून ठोस उपाययोजना होत नाहीत.

मिशन २०२७ – अंतिम संघर्ष

संविधान चौकात कार्यकर्त्यांनी विदर्भ राज्याची शपथ घेत २०२७ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य मिळविण्याचा संकल्प केला.

लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून राहू अशा घोषणा देत लढ्याची दिशा स्पष्ट केली.

प्रमुख उपस्थिती

ऍड. वामनराव चटप अध्यक्ष विराआस , डॉ. श्रीनिवास खांडेवाले (प्रमुख मार्गदर्शक), रंजना मामर्डे, मुकेश मासुरकर, अरुण केदार, डॉ. पी. आर. राजपूत, सुनील चोखारे, ऍड. सुरेश वानखेडे, अहमद कादर, माजी मंत्री डॉ. रमेश गजबे, प्रशांत नखाते, नरेश निमजे, ज्योती खांडेकर, गिरीश तितरमारे, कपिल इद्दे, मितीन भागवत, सुदाम रोठोड, अयुब शेख, प्रकाश लंके व सर्व जिल्हा व शहर पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post Next Post