Top News

जागेवर अतिक्रमण कायम; कारवाई न झाल्यास स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा.....

जागेवर अतिक्रमण कायम; कारवाई न झाल्यास स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा.....




दिग्रस | प्रतिनिधि हिरासिंग राठोड 9511729176 | डोळंबा येथील रहिवासी ग. भा. सुवर्णा प्रवीण जाधव यांनी आपल्या मालकीच्या जागेवर झालेले अतिक्रमण हटवून ताबा देण्यात यावा, अशी मागणी करत ११ ऑगस्टपासून पंचायत समिती दिग्रस समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

सुवर्णा जाधव यांच्या मालकीची, ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये नोंद असलेली मालमत्ता क्र. ५२५, क्षेत्रफळ ८४० चौ. फूट जागा असून, त्यावर शासनाचे घरकुल मंजूर झाले आहे. तथापि, शिवाजी विजयसिंह देशमुख यांनी गेल्या काही महिन्यांपासून गुरांचे सेंड, उकंडा व टीनाचे शेड उभारून अतिक्रमण केल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. 



यासंदर्भात ग्रामपंचायत डोळंबा, गटविकास अधिकारी, भूमि अभिलेख कार्यालय, पोलीस स्टेशन आर्णी व जिल्हा पोलिस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे दोन वेळा तक्रारी देऊनही अतिक्रमण कायम असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटविण्याऐवजी "कोर्टात जा" असे उडवा-उडवीचे उत्तर दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

जाधव यांनी जागेचे विकत घेतल्याचे पुरावे — नमुना ८, कर पावत्या, मोजणी प्रमाणपत्र — दाखल असूनही कारवाई होत नसल्याचे सांगत, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात चौकशीची मागणी केली आहे. अन्यथा, अन्यायाविरोधात आत्मदहनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.


Previous Post Next Post