खासदार किरसान दुचाकीवरून घनदाट जंगल पार करत पोहोचले मदतीला....
ताडगुडा गावात रानटी हत्तीचा धुमाकूळ : शेतकऱ्याचे घर उद्ध्वस्त
गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम (Remote) पोटेगाव अंतर्गत ताडगुडा गावात रानटी हत्ती (Wild Elephant) ने धुमाकूळ घालत शेतकरी माधव कोराम यांच्या घरासह धानाचे ढोले उद्ध्वस्त करून मोठे नुकसान केले.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे (Parliamentary Constituency) खासदार डॉ. नामदेव किरसान आणि जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यांचा अभाव आणि घनदाट जंगल असूनही डॉ. किरसान यांनी दुचाकीवरून वाट काढत ताडगुडा गाठले व पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
ताडगुडा हे गाव पूर्णपणे जंगलाने वेढलेले असल्याने तेथील नागरिकांना मूलभूत सुविधांच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. डॉ. किरसान यांनी प्रशासनाशी संपर्क साधून पीडित शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच वन्यप्राण्यांच्या वाढत्या त्रासावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी नरेंद्र पोटावी, संदीप पोटावी, मनोहर पोटावी, श्रीनिवास ताडपलीवार, शिवाजी नरोटे, दिवाकर निसार, प्रवीण हीचामी, गरिमा कोराम, दिवाकर तुमरेटी, मारुती हीचामी, आनंदराव गावडे, सुधाकर हीचामी, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, गौरव येणप्रेड्डीवार तसेच पोटेगाव वन परिक्षेत्र अधिकारी (Forest Range Officer) कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

