अतिवृष्टीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन...
नुस्कानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी..!
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना अद्यापही पंचनामे करण्यात आले नाही.
आर्णी | तालुका प्रतिनिधि | हिरासिंग राठोड :: आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा या दुर्गम परिसरात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले,ढगफुटी सह मुसळधार झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक खरडून गेलेत,त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,हाती तोंडी आलेले पीक पावसामुळे उध्वस्त झाल्याने शेतकरी हाताश झाला आहेत,नुस्कानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी या मागणी करिता बारभाई व चिंचबर्डी या गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदार आर्णी यांना लेखी निवेदन देऊन तत्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी केली,यावेळी किसन राठोड, प्रकाश राठोड,तारासिंग चव्हाण, बळीराम चव्हाण,प्रेम राठोड,महेद्र राठोड, बंडू जाधव,मामराज राठोड,सह परिसरातील बहुतांश शेतकरी उपस्थित होते.
