शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मानोरा संविधान मंदिराचे थाटात लोकार्पण सोहळा
आर्णी | तालुका प्रतिनिधि | हिरासिंग राठोड :: संविधानापूर्वी भारतात जाती व्यवस्था होती तेव्हा त्याचे संबंधित व्यवसाय उद्योगधंदे करण्याची शक्ती होती मात्र संविधान अमलात आल्यानंतर आवडीनुसार व्यवसाय करायचा हक्क आपल्याला भारतीय संविधानाने दिला आहे. या संविधानातील सर्वांनी आपले हक्क व कर्तव्य याचे वाचन केले पाहिजे असे मत आडे तहसीलदार मानोरा यांनी व्यक्त केले. ते स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आय. टी. आय ) रविवार (ता. 15) आयोजित संविधान मंदिराच्या लोकार्पणप्रसंगीत बोलत होते हा कार्यक्रम स्थानिक आयटीआय मध्ये प्राचार्य सचिन व्ही.नखाते यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला होता..
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदीप आडे (तहसीलदार मानोरा )तर प्रमुख अतिथी देशमुख (एल. एस. पी. एम चे प्राचार्य ) तर प्रमुख वक्ते मनून ऍड.ऋषिकेश पाटील, ऍड.इंगोले.
कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग व व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे लोकार्पण झाले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्थानिक आयटीआय मध्ये सुद्धा संविधान मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रभारी प्राचार्य आर. पी.काळे यांनी म्हटले की प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या भारतीय संविधानाची शिकवण देण्यात येणार असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या पिढीला माहिती व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे म्हटले, तर प्रमुख व्यक्ते ऍड.ऋषिकेश पाटील यांनी संविधान उद्दिशिकेविषयी विस्तृत माहिती प्रशिक्षनार्थ्यांना दिली. यावेळी अनेक प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
यापूर्वी आयटीआय मानोरा मध्ये संविधान मंदिर महोत्सव 12 ते 14 सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात आला असून यामध्ये संविधान विषयी निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा,रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता आर. पी काळे,पी.पी जामकर, पी.एन.सोमाणी,सुरज जंजाळ ,एस. के. ठाकूर, पी. बी. किनाके, एन. के. तायडे, एम. व्ही. मुराळे, ए. एस. जाधव, जि. एम सरोदे, एस.राठोड,पी.ए रील,कार्तिक घोडे, चव्हाण यांच्यासह प्रशिक्षणार्थ्यांनी मेहनत घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्प निदेशक प्रणय जामकर तर आभार प्रदर्शन शिल्पनिदेशक अर्जुन जाधव यांनी केले.
