सैय्यद जाकिर हुसैन यांना बी. ए. इन लाॅ पदवी प्रदान
आर्णी : विद्या प्रसारक मंडळ संचालीत स्वतंत्र सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयात नुकताच पदवी दान सोहळा संपन्न झाला यात आर्णी चे भुषण सैय्यद जाकीर सैय्यद रहिम सैय्यद यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची बी. ए. इन लॉ परीक्षा उन्हाळी २०२३ मध्ये उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांना ही पदवी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सी.ए.प्रकाश चोपडा होते. त्याचसोबत वरीष्ठ विधीज्ञ ए.पी. दर्डा , वरीष्ठ विधीज्ञ आर. के. मनक्षे ,विप्र मंडळाचे सहसचिव विधीज्ञ महेंद्र ओसवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजेश मुणोत व नॅक समन्वयक डॉ. संदीप नगराळे यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी विधी पदवीधारक तथा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले कि विधी व्यवसायात पदार्पण करणे सोपे आहे परंतु व्यवसायात टिकुन राहण्यासाठी सचोटी तसेच परीश्रम करणे महत्त्वाचे असते. भारताचे संविधान जगात सर्वोत्तम आहे आणि त्यातील मुल्ये ,अधीकार ,कर्तव्ये जपणे हे सर्व नागरिक आणि विधी व्यावसायिकांचे काम आहे. यावेळी त्यांनी नवोदीत वकिलांना पुढील उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच ॲड. इरफान चव्हाण, ॲड. जावेद शेख, ॲड. शाहरुख शेख, सैय्यद रहेमान, अनिल खडसे, पर्यटन भुषण राजु पटेल मलनस, हर्षपाल कांबळे,शेख शफीक, सुलेमान फाजलानी व मित्र मंडळांनी शुभेच्छा दिल्या.
