झरी तालुक्यातील अवैद्य धंद्यावर वचक बसावा - गजानन मिलमीले मनसे तालुका अध्यक्ष
झरी (ता. प्र.) जगदिश खनके :: झरी तालुक्यात सरसपणे दारू विकणे , मटका जुगार अड्डा, रेती उत्खनन,अवैध वाहतूक, तसेच गो तस्करी अश्या अनेक अवैध धंदे सुरू आहे. या गोष्टींकडे प्रशासनच दुर्लक्ष का होत आहे? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून करण्यात आला. तसेच पाटण पोलिस ठाणेदार यांना निवेदन देऊन या गोष्टींकडे लक्ष देण्याचे सांगितले. या वेळेस मनसेचे तालुका अध्यक्ष गजानन मीलमिले, तालुका उपाध्यक्ष प्रफुल चुक्कलवार, विभागीय अध्यक्ष कृष्णा आईटवार,विभागीय उपाध्यक्ष विनोद गिज्जेवार, बालाजी पेद्दापेल्लिवार, शब्बीर शेख, जनार्दन चिंचोलकर व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
.jpg)