जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांच्या नेतृत्वात सरपंच निघाले मुंबई वारीला.
चंद्रपूर /राजुरा : मनोज श्रीहरी गोरे | उपजिल्हा प्रतिनिधी :: अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील, राज्य सल्लागार प्रा. राजेंद्र कराडे, विदर्भ अध्यक्ष अँड. देवा पाचभाई यांच्या नेतृत्वाखाली मागिल 16 आँगस्ट पासून राज्यातील ग्रामपंचायतीचे कामं बंद आंदोलन सुरू आहे. 28 आँगस्ट ला मुंबई येथे आंदोलन करण्यात येणार असून त्या करिता चंद्रपूर जिल्हातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ची वाट धरली आहे.
गाव विकासासाठी नेहमी सामाजिक बांधिलकी जपत काम करणारे सरपंच यांना त्यांच्या काम करण्याच्या अनुषंगाने कुठे ही न्याय दिल्या जात नाही. सरपंच सुध्दा पंचायत राज व्यवस्थे मधला महत्वाचा लोकप्रतिनिधी आहे. गावचा पुढारी म्हणून संपूर्ण गावात भार तो उचलत असतो मात्र त्याला अनेक अडचणीला सामना करावा लागतो. त्यांच्यासाठी कुठेही संरक्षण कवच नाही. आपल्यावर होणारा अन्यायकारक वागणुकीचा विरोधात पहिल्यादाच काम बंद आंदोलन व मुंबई येथे आंदोलन करुन सरपंचाच्या स्वतंत्र मागण्या पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. अशा परिस्थितीमध्ये गाव मात्र पोरका झाला आहे म्हणून या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज असुन गाव विकासाचा पाया जोपर्यंत मजबूत होणार नाही तोपर्यंत गाव खेड्यातील सरपंच पुढारयाचा असाच वापर होत राहिल म्हणून एकदाची आर पार ची लढाई सरपंचांनी मुंबई येथे पुकारली आहे.
यात जिल्हा अध्यक्ष सरपंच नदकिशोर वाढई यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप, कोरपना अध्यक्ष अरुण काळे, सचिव अरुण रागीट , राजुरा अध्यक्ष शंकर मडावी सरपंच देविदास सातपुते अध्यक्ष गोड पिंपरी, सरपंच पुरुषोत्तम चुधरी अध्यक्ष सावली, सरपंच सिताराम मडावी अध्यक्ष जिवती, सरपंच नयन जांभूळे अध्यक्ष वरोरा,सरपंच मंगेश राव भोयर वरोडा, सरपंच गणेश राव गडडमवार अध्यक्ष नागभीड, सरपंच संध्याताई पाटील अध्यक्ष चंद्रपूर सरपंच मंगेश धाडसे चिमुर,यासह चंद्रपूर जिल्ह्य़ातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य हे मुंबई कडे रवाना झाले आहेत.
