Top News

सावळी परिसरातील विद्युत समस्या बाबत विद्युत अधीक्षक अभियंता यांना लेखी निवेदन

सावळी परिसरातील विद्युत समस्या बाबत विद्युत अधीक्षक अभियंता यांना लेखी निवेदन



सावळी सदोबा (ता.प्र.) हिरासिंग राठोड :- आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा या ग्रामीण भागात मागील अनेक दिवसापासून विद्युतची समस्या कायम आहे,परिसरातील नागरिकांना खंडित वीज पुरवठ्या अभावी रात्र -रात्र अंधारात काढावी लागत आहे,विद्युत समस्यांनी परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत,विद्युत समस्याला घेऊन परिसरात अनेकदा आंदोलने आणि मोर्चे झालीत मात्र याचा काही परिणाम झाला नाहीत,विद्युतची समस्या या परिसरात आजही कायमच आहे,उन्हाळ्यामध्ये विहिरीला पाणी असताना सुद्धा विद्युत अभावी परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी पिके घेता येत नाही,ओलीत असून सुद्धा काही फायदा नाहीत अशी अशी खंत परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक व्यक्त केली,हा परिसर अतिशय दुर्गम असल्याने या परिसराकडे शासनाचे लक्ष नाहीत,विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराविषयी शेतकऱ्याकडून नाराजी व्यक्त होत आहे,परिसरातील विद्युत समस्या निकाली काढण्यासंदर्भात आज सावळी सदोबा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अविनाश भगत व नुनेश्वर आडे यांनी यवतमाळ येथील विद्युत अधीक्षक अभियंता यांना भेटून सावळी सदोबा परिसरातील विद्युत समस्या बाबत चर्चा करून लेखी निवेदन देण्यात आले,या निवेदनात आज रोजी परिसरातील विद्युत पुरवठा घाटंजी येथून होत असून,घाटंजी ते सावळी 70 किलोमीटर अंतर असून,विद्युत पुरवठा जंगलाच्या मार्गाने होत असल्याने,पावसाळ्यामध्ये या विद्युत वाहणीवर जंगलातील झाडांच्या फांद्या किंवा झाडे पडल्याने नेहमीच वीजपुरवठा खंडित होतो, त्यामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो,तसेच या परिसरात विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहण्या जीर्ण झाल्याने विद्युतच्या समस्या कायम निर्माण होत आहे,त्यामुळे जवळा येथिल सबस्टेशन वरून या परिसरात विद्युत पुरवठा जोडल्यास परिसरातील विद्युत समस्या कायमस्वरूपी निकाली लागेल,आणि या परिसरातील नागरिकांना विद्युत समस्या पासून मुक्ती मिळेल अशा प्रकारचे लेखी निवेदन देण्यात आले आहे, यावेळी सावळी सदोबा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा भीम शक्ती सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष अविनाश भगत व माजी कृषी उत्पादन बाजार समिती उपसभापती नुनेश्वर आडे उपस्थित होते.

Previous Post Next Post