वनसडी येथे बंधिस्त नाली बांधकामाचे भुमिपुजन
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना ता.प्र. रोशन आस्वले
वनसडी ग्राम पंचायत अंतर्गत पेसा निधीतून नालीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज संपन झाले . किणाके यांच्या घरापासूण सदर नालीचे बांधकाम होणार आहे . गावाच्या विकासासाठी सदैव कटिबध्द राहुन गावात विकासकामे निरंतर चालु राहणार आहे व ग्राम विकासाची गंगा घराघरात पोहचवीण्यासाठी ग्राम पंचायत काम करणार आहे असे मत उपसरपंच इरफान शेख यांनी व्यक्त केले
सदर भूमीपूजनाला काँग्रसचे नेते राजाबाबु गलगट, जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष ललिता गेडाम , सरपंचा मंगला आत्राम , उपसरपंच इरफान शेख , आदिवासी सोसायटीच्या संचलिका गीता किंनाके, ग्राम पंचायत सदस्य नंदू गेडाम , आदिवासी नेते नीलकंठ किनाके , श्रीकांत झाडे इत्यादी उपस्थित होते..
