समिधा सेवा संस्था, नागभीड द्वारा संचालित सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालय नागभीड येथे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न....
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालय नागभीड येथे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले गेले .
समिधा सेवा संस्था,नागभीड अध्यक्ष गणेश तर्वेकर,सचीव अजय काबरा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.रेखा नवखरे प्रा. कुंभरे हे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद , राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच दीप प्रज्वलित करून झाली. कार्यक्रमाला संबोधन करताना डाॅ.रेखा नवखरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेतून एक समाजाचा नागरिक या नात्याने समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी कसा हातभार लावला पाहिजे यावर प्रकाश टाकला. तसेच प्रा.कुंभरे यांनी कठोर परिस्थिती चा सामना करून थोर व्यक्ती यशाची शिखरे गाठत असतो म्हणून कठोर परिस्थितीला न घाबरता विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन केले.
राजमाता जिजाऊ यांच्या जिवनावर विशाखा ठीकरे तर स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर अंजली उरकुडे या विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन बि.ए. प्रथम वर्षाची विद्यार्थीनी कु. अंकिता शेंडे, आभार प्रदर्शन कु. संजना मुळे हिने केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी प्रभाकर सावरकर, रूख्मीनी मानापुरे, ऐश्वर्या तर्वेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

