Top News

कोरपना तालुक्यातील शेरज बु. च्या सचिन चे सुयश सचिन तिरनकर पीईटी (पेट)परीक्षा उत्तीर्ण.......Sheraj Bu of Korpana taluk. Sachin's Suyash Sachin Tirankar passed PET (Pet) exam

कोरपना तालुक्यातील शेरज बु. च्या सचिन चे सुयश सचिन तिरनकर पीईटी (पेट)परीक्षा उत्तीर्ण


विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 


गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीतर्फे घेण्यात आलेल्या पीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यामध्ये ग्रामीण भागातील समाज कार्यची आवड असलेला कोरपना तालुक्यातील शेरज बु. येथील सचिन बटाऊ तुराणकर यांनी पहिल्याच प्रयत्नात सुयश मिळविले आहे. 

सचिनने अर्थशास्त्र विषयात पीईटी परीक्षा उत्तीर्ण केली. पीएचडी प्रवेशासाठी प्रवेश चाचणी म्हणून पीईटी परीक्षा गोंडवाणा विद्यापीठाकडून घेण्यात आली होती. यामध्ये यश संपादन केले आहे. तो  महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे परिक्षांनाही प्रविष्ठ झाला असुन मुख्यपरीक्षा थोड्या गुणानी पास करता आली नाही परंतु जिद्द कायम असुन तयारी सुरू आहे.  प्रशासकीय अधिकारी होन्याची आशेने वाट पाहत  आहे, त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सचिनने त्याचे यशाचे श्रेय आई - बाबा,नातेवाईक,मार्गदर्शक , गुरूवर्य आणि मित्र परिवाराला, स्टुडेंट फोरम ग्रुप च्या मार्गदर्शक सदस्याना दिले आहे. 

Previous Post Next Post