Top News

प्राचार्य संजय ठावरी भारतरत्न डॉ .बी. आर. आंबेडकर भारतभूषण पुरस्काराने सन्मानित......Principal Sanjay Thavari Bharat Ratna Dr.B. R. Awarded Ambedkar Bharat Bhushan Award

प्राचार्य संजय ठावरी भारतरत्न डॉ .बी. आर. आंबेडकर भारतभूषण  पुरस्काराने सन्मानित



विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 

आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशन न्यू दिल्ली द्वारा संविधान सम्मान दिवस समारोह २०२३  कांस्टीट्यूशन क्लब, डेप्यूटी स्पीकर हॉल ,न्यू दिल्ली येथे रविवार ला 3 डिसेंबर ला पार पडला. यात कोरपना येथील वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत प्राचार्य संजय ठावरी  यांना भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर भारत भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक पातळीवर राष्ट्रनिर्माण कार्यात योगदान असनारे , देशभरातील विविध राज्यातील कर्तुत्ववान व्यक्तीना भारतरत्न डॉ.बी आर आंबेडकर भारतभूषण अवॉर्ड २०२३ प्रमाणपत्र , सम्मान चिन्ह देऊन गौरविन्यात आले. याप्रसंगी मुख्य आयोजक नेशनल यूथ अवॉर्ड प्राप्त भारत सरकार डॉ. मनीष गवई ,राष्ट्रीय सफाई कामगार आयोग अध्यक्ष एम .वेंकटेशन, डॉक्टर आदित्य पाठक, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग माजी सदस्य सुरेखा लामचूरे, डॉ.उर्वशी मित्तल, फाऊंडेशन चे सदस्य आदी उपस्थित होते. 

तसेच या कार्यक्रमात हीरालाल मेमोरियल फाउंडेशन चे लोगो चे विमोचन झाले. ठावरी  यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्या चाहत्यानी स्वगृही भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक संजीव चांदूरकर ,प्रदीप नागोसे , पुरुषोत्तम ऊईके , अजय राठोड , खान सर, सत्यवान घोटेकर ,सुभाष   तुराणकर ,विजयराव गोवारदीपे,आनंद पानघाटे ,अजय  चांदूरकर उपस्थित होते .प्राचार्य ठावरी  यांचे शैक्षणिक, सामाजिक  व सहकार क्षेत्रातील कार्य भरीव असुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे भविष्य घडविनारे  उपक्रम राबबित असतात.

मिशन आयएएस  वेध भविष्यचा उपक्रम,सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजन,राष्ट्रीय एकात्मता वृद्धिगत करण्यास युवक व ज्येष्ठाशी संपर्क साधून असतात.  ग्रामीण भागातून पुरस्कार प्राप्त झाल्याने स्नेहीजन, विद्यार्थी,सर्वत्र निकटवर्तीयात आनंदाचे वातावरण पसरले असुन शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. त्यांनी आपल्या पुरस्कारा चे श्रेय समस्त मार्गदर्शक, आई वडील यांना दिले आहे.



Previous Post Next Post