Top News

अखिल भारतीय औषधि विक्रेता संघटना चे ( AIOCD ) अध्यक्ष, केमिस्ट हृदयसम्राट जगन्नाथ शिंदे यांचे केमिस्ट एसोसिएशन नागभीड तर्फे स्वागत......Chemist Hridaysamrat Jagannath Shinde, President of All India Association of Drug Dealers (AIOCD) was welcomed by Chemists Association Nagbhid...

अखिल भारतीय औषधि विक्रेता संघटना चे ( AIOCD ) अध्यक्ष, केमिस्ट हृदयसम्राट जगन्नाथ शिंदे यांचे केमिस्ट एसोसिएशन नागभीड तर्फे स्वागत.......


जयहिंद मेडिकल स्टोर्स, नागभीड़ ला शुभेच्छा भेटी दिली दरम्यान विजय काबरा यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत....

विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड

अखिल भारतीय औषधि विक्रेता संघटना चे ( AIOCD ) अध्यक्ष, केमिस्ट हृदयसम्राट आप्पासाहेब ऊर्फ जगन्नाथ शिंदे एका कार्यक्रमा निमित्ताने गड़चिरोली ला जात असतांना नागभीड येथे केमिस्ट एसोसिएशन तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. 


यावेळी त्यांचे सोबत महाराष्ट्र राज्य औषधि विक्रेता संघटना ( MSCDA ) चे उपाध्यक्ष मुकुंद दुबे, सह सचिव प्रसाद दानवे, संगठन सचिव मदन पाटिल उपस्थित होते.

 नागभीड येथील थोक औषधि विक्रेता जयहिंद मेडिकल स्टोर्स, नागभीड़ ला शुभेच्छा भेटी दिली दरम्यान विजय काबरा यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. MSCDA च्या विदर्भ झोन चे उपाध्यक्ष सुरेश सारडा , गोविंद निरंकारी सुद्धा गडचिरोली जिल्हा तर्फे उपस्थित होते. 


या भेटी दरम्यान खुले चर्चासत्र अंतर्गत केमिस्ट बंधूंसमोर येणार्‍या अडचणी आणि औषधि विक्री व्यवसायात येणार्‍या समस्यांना कसे मात करावे यावर AIOCD चे अध्यक्ष श्री जगन्नाथजी शिंदे यांनी उचित मार्गदर्शन केले .

नागभीड तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष  मनमोहन कलंत्री , सचिव विजय बोरकर , विलास पुंडे , अशोक वारजुकर , रामसेवक सिंह, महेश राखड़े , आनंद काबरा , रवी पारधी ,  कैलाश तित्तिरमारे व इतर सर्व केमिस्ट बांधव उपस्थित होते . चर्चासत्राचे संचालन अजय काबरा यांनी केले तर विजय बोरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Previous Post Next Post