आमदार बंटी भांगडिया यांनी दिली तळोधी येथील युवकास उपचाराकरिता आर्थिक मदत....
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
नागभीड तालुक्यातील मौजा - तळोधी येथील रहिवासी अनिल शिवा कामडी यांची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना ब्रम्हपुरी येथील गेडाम हॉस्पिटलला भरती केले. परंतु उपचारासाठी अधिक खर्च येत असल्याने त्यांनी स्थानिक भाजपा पदाधिकारी मार्फत आमदार बंटी भांगडिया यांच्या कडे मदतीचा विनंती अर्ज केला असता. चिमूर विधानसभेचे आमदार बंटी भांगडिया यांनी लगेच तालुकाध्यक्ष संतोष रडके यांच्या मार्गदर्शनात बूथ प्रमुख सुनंदा मदनकर, कुसुम कामडी,मनीषा कामडी, पुष्पा नखाते यांच्या हस्ते रुग्णाला घरपोच आर्थिक मदत पाठविण्यात आली.
