Top News

भाजपा विदर्भ प्रदेश संघटन मंत्री उपेन्द्र कोटेकर यांची भाजपा जनसंपर्क कार्यालयाला भेट....BJP Vidarbha Pradesh Organization Minister Upendra Kotekar's visit to BJP Public Relations Office....

भाजपा विदर्भ प्रदेश संघटन मंत्री उपेन्द्र कोटेकर यांची भाजपा जनसंपर्क कार्यालयाला भेट....



विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड

आज ब्रम्हपुरी येथे आयोजित पक्ष संघटन बैठकीला भाजपा विदर्भ प्रदेश संघटन मंत्री उपेन्द्र कोटेकर हे आले असता बैठकीनंतर त्यांनी बैठकीनंतर भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय नागभीड येथे भेट देऊन कार्यालय व वॉर रूमची पाहणी केली. 

तत्पूर्वी उपेन्द्र कोटेकर यांचे भारतीय जनता पार्टी तालुका नागभीड च्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. त्यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांशी परिचय करून वॉर रूम मधून होणाऱ्या कामाचा आढावा घेतला. व कार्यकर्त्यांना शासनाच्या योजनाची माहिती व योजनेचे लाभार्थी यांच्यासोबत नेहमी संपर्क साधत राहण्याचे मार्गदर्शन केले.

यावेळी चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, तालुकाध्यक्ष संतोष रडके, विधानसभा वॉर रूम प्रमुख सचिन आकुलवार,जेष्ठ नेते हरि गरफडे,अजय काबरा, भाजयुमो शहर प्रमुख हेमंत नन्नावरे,दिनेश समर्थ ,माजी नगरसेवक रुपेश गायकवाड, शुभम चिल्लुरे, स्नेहा कुर्झेकर, उज्वला भुरे,नितु गोन्नाडे, नीरज वार्जूरकर,आनंद भरडकर, दिलीप चौधरी, अरुणजी खापरे, जहांगीर कुरेशी, राजू पिसे,प्रवीण गीरीपुंजे, श्रीकांत माटे,रमाकांत ठाकरे, योगेश मिसार,विजय संदोकर, भूपेश चीलबुले व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post