नागभीड नगरीत भगवान श्रीराम यांच्या "अक्षदा कलश" यात्रा संपन्न...
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
अयोध्या येथे श्रीराम मंदिर निर्माण कार्यक्रम सुरु असताना 22 जानेवारी ला संपन्न होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा व आराध्य श्रीराम यांचा आशीर्वाद म्हणून श्रीराम जन्मभूमी न्यास अयोध्या समिती मार्फत सुरु असलेल्या अभियान अंतर्गत अयोध्येवरून आणलेल्या अक्षदांचा कलशाचे आज नागभीड विठ्ठल रुखमिनी मंदिर ते राममंदिर पर्यंत भजनदिंडीच्या गजरात व जय श्रीराम च्या जयघोषात कलश यात्रा श्रीराम जन्मभूमी न्यास अयोध्या समिती नागभीड व भारतीय जनता पार्टी च्या वतीने काढण्यात आली.
कलश राममंदिर चे ट्रस्टी डॉ.राजन जैस्वाल, अभियान प्रमुख ब्रम्हपुरी नितीन येरपुडे, जिल्हा कार्यवाहक नंदु लेनगुरे, जिल्हा सेवा प्रमुख प्रकाश निकोडे ,भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके, माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार याच्या उपस्थितीत राममंदिर नागभीड येथे ठेवण्यात आले, व मान्यवरांच्या हस्ते नागभीड प्रभागातील व तालुक्यातील ग्रामप्रतिनिधी कडे अयोध्येवरून आलेल्या अक्षदांचे व माहिती पत्रकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, अजय काबरा ट्रस्टी विठ्ठल मंदिर नागभीड, मोरेश्वर येरणे,कार्यक्रम मार्गदर्शक हरि गरफडे , अभिषेक जैस्वाल,देवानंद बावकर, विलास दोनोडे,ईश्वर मेश्राम, इंदु आंबोरकर,पवन नागरे,सुनील शिवणकर,अरविंद भुते,संजय मालोदे,शुभम चिल्लुरे, प्रफुल लांबट, विनोद वरखडे, गोपाल नाकाडे,रुपेश गायकवाड, शिरीष वानखेडे,दिनेश समर्थ,
अरुण खापरे,जहांगीर कुरेशी,रमाकांत ठाकरे, राजू पिसे,शुभम येरणे,नितेश कुर्झेकर,मनोहर चौधरी,विनोद निशाने,विजय संदोकर,ब्रम्हानंद नवघडे,नंदू वाढणकर,विनोद निकुरे, अशोक पांडव,नीरज वार्जूरकर,प्रिया लांबट,प्रियंका कोरे,स्नेहा कुर्झेकर,उर्मिला अमृतकर,दुर्गा चीलबुले,पूनम बोरकर,वनिता गीरीपुंजे,अनिता गीरीपुंजे,नीतू गोन्नाडे,उज्वला भुरे व अन्य मोठ्या प्रमाणात रामभक्त कार्यकर्ते उपस्थित होते.



