आर्णी तालुक्यातील 'मग्रारोहयो ' योजनेतील 300 कोटीच्या भ्रष्टाचाराची SIT मार्फत चौकशी करा...
अक्षय राठोड यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी.
6 महिन्याचा कालावधी होऊन गठीत समिती कडुन चौकशी नाही..
विदर्भ माझा न्युज 24 - हिरासींग राठोड तालुका प्रतिनिधी, आर्णी
तालुक्यातील मनरेगा अंतर्गत सन 2018 ते 2023 पर्यंत झालेल्या कामामध्ये माहितीच्या अधिकारात माहीत प्राप्त झाल्यानंतर प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यानंतर जवळपास 200 ते 300 भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अक्षय राठोड यांनी केला होता.
यासंदर्भात अक्षय राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे निवेदन देऊन चौकशीची मागणी केली. पालकमंत्री संजय राठोड यांनी निवेदनाची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आर्णी तालुक्यातील मनरेगाचे झालेल्या कामासंदर्भात उचित कारवाई करण्याबाबत विनंती केलेली होती. त्यानंतर झालेल्या कामांची सखोल चौकशी होण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. तेव्हा सदर समिती गठीत होऊन जवळपास ६ महिने होऊनही अद्याप पर्यत कुठल्याही प्रकारे चौकशी सुरु केलेली नाही.
तरी सदर प्रकरण विशेष पथकामार्फत (SIT) तपास होणे गरजेचे आहे. सदरचा प्रथमदर्शनी घोटाळा असल्याने व मोठया प्रमाणात आर्थिक घोटाळा असल्याने विशेष पथक (SIT) मार्फत गृहखाते अंतर्गत चौकशी करण्यात यावी अशी विनंती अक्षय राठोड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.यामुळे तालुक्यातील मनरेगा अंतर्गत झालेल्या कामांची सखोल चौकशी झाल्यास मोठ्या घोटाळा उघडकीस होण्याची दाट शक्यता आहे.यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचारी त्याचबरोबर ठेकेदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
