Top News

पोलिस निरीक्षक घारे यांच्या मार्गदर्शनात प्रो.व्ही नाकेबंदी दरम्यान दारूची अवैद्य वाहतुक करणारे वाहन व तिन आरोपी पोलिसांच्या ताब्यात......Under the guidance of Police Inspector Ghare, during the blockade of Prof.V, the vehicle and the three accused in the custody of the police...

पोलिस निरीक्षक घारे यांच्या मार्गदर्शनात प्रो.व्ही नाकेबंदी दरम्यान दारूची अवैद्य वाहतुक करणारे वाहन व तिन आरोपी पोलिसांच्या ताब्यात......


तालुक्यातील अवैद्य व्यावसायीकांचे धाबे दणाणले........



विदर्भ माझा न्युज 24 - नागभिड

 नागभीड शहरातील टी-पॉइंट येथे पोलीस निरीक्षक योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने प्रो. व्ही. बाबत नाकेबंदी केली असता अवैद्य दारू तस्करी करणार्या वाहनाला पकळण्यात पोलिसांशा यश प्राप्त झाले. तब्बल ९०,१६०/- रू. कींमतीचा मुद्दे मालासह तिन आरोपींना नागभिड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिस निरीक्षक योगेश घारे यांना मीळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे प्रो. व्ही. बाबत नाकेबंदी केली अस्ता दरम्यान आरोपी हा पांढऱ्या रंगाच्या हिरो डिस्टेनी स्कुटी क्र. MH-34-CE-8167 ने अवैद्यरित्या दारू वाहतूक करीत असताना सापडला.

किंमत २०,१६० रु एकूण सहा खर्डेचे खोक्यात २८८ नग देशी दारू सखु संत्रा टॅगो प्रीमियम कंपनीच्या प्रत्येकी १८० मि.ली. ने भरलेल्या काचेच्या सीलबंद शिष्या प्रति नग ७० रुपये प्रमाणे. किंमत ७०,०००/-रु. दारू वाहतुकीकरिता वापरलेली पांढऱ्या रंगाची हिरो डिस्टेंनी मोपेड क्रमांक MH-34-CE-8167 व आरोपी असा एकूण ९०,१६०/- रुपयांचा चा माल अवैधरित्या वाहतूक करीत असता मिळून आल्याने आरोपी सुरज अशोक खोब्रागडे (२६) रा.बोथली तालुका नागभीड, जि. चंद्रपूर, कैलास माकोडे रा. नागभीड, रुपेश अडके रा. नवेगाव पांडव, ता. नागभीड यांच्यावर पोलीस स्टेशन नागभीड येथे भांदवि कलम 65 (अ) 83 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांच्या कार्यवाहीने अवैद्य व्यवसायीकांचे चांगलेच धाबे दणाणले ‌आहे. पोलिस निरीक्षक योगेश घारे हे नागभिड पोलिस स्टेशन ला ‌रूजू झाल्या पासुनच अवैद्य व्यावसायीकांनचे धाबे दणाणले आहे.  पोलिसांच्या या कार्यवाही बाबद नागरिक कौतुक करीत आहे.


Previous Post Next Post