Top News

होली फेथ प्रायमरी स्कूल मध्ये संविधान दिन साजरा........Constitution Day celebration at Holy Faith Primary School.

होली फेथ प्रायमरी स्कूल मध्ये संविधान दिन साजरा.


 विदर्भ माझा न्युज 24 - हिवरखेड

हिवरखेड येथील होली फेथ प्रायमरी स्कूल येथे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमचे अध्यक्ष, प्रा.अस्वार होत्या. तर प्रमुख उपस्थिती म्हणून शिक्षीका सोनोने,इंगळे,शेळके,अग्रवाल,कुऱ्हाडे , रेखाते ,वानखडे ,फोपसे , वायकर, ढेंगेकर ,राजाराम इंगळे उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. प्रा. अस्वार यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधाना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत,भारतीय संविधान हे जगातील एक आदर्श संविधान आहे. संविधानामुळे देशातील नागरिकांना हक्क व कर्तव्य मिळालेली आहेत, सर्वांनी संविधानातील मूल्याची जपवणूक करावी असे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आदर्श नागरिक बनावे असेही ते म्हणाले. सदर कार्यक्रमाचे प्रस्तावि शीक्षीका कुऱ्हाडे  व सूत्रसंचालन  शिक्षीका शेळके  यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन शिक्षीका प्रिया वालचाळे यांनी केले .

Previous Post Next Post