Top News

भोपळे विद्यालयात महात्मा फुले स्मृतीदिनाचे आयोजन........Mahatma Phule Memorial Day organized in Bhosle Vidyalaya.

भोपळे विद्यालयात महात्मा फुले स्मृतीदिनाचे आयोजन.




विदर्भ माझा न्युज 24 - अकोला / हिवरखेड

हिवरखेड येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, प्रमुख उपस्थितीत व्याख्याते प्रा.पुंडलिक भामोदे, संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे, सहकार्यवाह स्नेहल भोपळे, लेखक आनंद गोठकडे, अखिल भारतीय माळी समाजाचे सुभाष भड, संस्थेच्या संचालिका साधना भोपळे, नीलिमा भोपळे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेतील अनिता वाडेकर, सेवानिवृत्त अधिकारी धैर्यशील भोपळे हे होते. 

याप्रसंगी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून उपस्थितीतांनी अभिवादन केले. या दिनाचे औचित्य साधून मी महात्मा जोतीराव फुले बोलतोय ह्या एकपात्री नाट्यप्रयोगातून व्याख्याते प्रा.पुंडलिक भामोदे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आपल्या अध्यक्षीय भाषणातून अनिलकुमार भोपळे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगून ज्ञानार्जनामुळे सर्व काही चांगले ध्येय गाठता येते, यासाठी विद्यार्थ्यांनी मनापासून शिक्षण घ्यावे, असा संदेश दिला.

 यावेळी प्रा.भामोदे व अनिता वाडेकर यांचा महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे समाजात प्रबोधन करीत असल्याबद्दल त्यांचे संस्थेचे वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्राचार्य संतोषकुमार राऊत यांनी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक दादासाहेब भोपळे  हे शिक्षणविषयक कार्य करीत असून शिक्षणामुळे शाळेतील शेकडो विद्यार्थी विविध क्षेत्रात सामाजिक विकासासाठी  योगदान देत आहे, हीच महात्मा जोतीराव फुले यांच्या शिक्षणविषयक कार्याची प्रचिती दिसून येत असल्याचे मत प्रतिपादन केले. 

या कार्यक्रमाचे संचलन रंजित राठोड व सुनील वाकोडे यांनी तर आभारप्रदर्शन अभिजित भोपळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे पर्यवेक्षक गणेश खानझोडे यांच्या मार्गदर्शनात शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post Next Post