आमदार भांगडीया यांच्या उपस्थीतीत नागभीड येथे तालुक्यातील समस्त शासकीय अधिकारी तथा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर व सिआरपी यांच्या दिवाळी स्नेहमिलन सोहळा संपन्न.......
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
चिमुर विधानसभेचे आमदार बंटी भांगडीया यांनी ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड येथे भांगडीया फाउंडेशन तर्फे आयोजित तालुक्यातील समस्त शासकीय अधिकारी तथा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर व सिआरपी यांच्या दिवाळी स्नेहमिलन सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. यावेळी सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांशी विविध विषयांवर संवाद साधला आणि सर्वांचे औक्षण करीत शुभेच्छारुपी भेटवस्तू व फराळाचे वितरण आमदार भांगडीया यांनी केले.
या दिवाळी स्नेहमिलन सोहळ्याला प्रामुख्याने तहसीलदार नागभीड चौहान, गटविकास अधिकारी पं.स. नागभीड प्रणाली कोचरे, पोलीस निरीक्षक पो.स्टे. नागभीड घारे, उपअभियंता महावितरण नागभीड काळे, तालुका आरोग्य अधिकारी नागभीड मडावी, वन परिक्षेत्र अधिकारी नागभीड हजारे तसेच,
भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके, भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजूकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, नागभीड कृ.उ.बा. समिती सभापती अवेश पठाण, नागभीड कृ.उ.बा. समिती उपसभापती रमेश बोरकर, नागभीड कृ.उ.बा. समिती संचालक गणेश तर्वेकर, माजी बांधकाम सभापती न.प. नागभीड सचिन आकुलवार, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा इंदु आंबोरकर, भाजपा नेते जहांगीर कुरेशी, लांबट , ॲड. चौधरी व अन्य मान्यवर उपस्थित होते.


