Top News

शेतकर्यांच्या विविध समस्यांन करीता धरणे आंदोलन........ Dharne movement for various problems of farmers.....

शेतकर्यांच्या विविध समस्यांन करीता धरणे आंदोलन.....



विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी



        महावितरण कंपनीकडून मनमानी कारभार चालवत सावळी सदोबा  व परिसरातील ४२ गावांचा वारंवार वीजपुरवठा खंडित करून नाहक त्रास देण्याचे काम चालू आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याची गैरसोय, बँका व इतर प्राथमिक सुविधा तर शेतातील हाती आलेली पिके पाण्या अभावी जळून जात आहे. त्यामुळे या बाबीकडे प्रशासनाने लक्ष द्यावं यासाठी राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरद पवार गट) शिवसेना (उबाठा गट) महाविकास आघाडी व शेतकरी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महावितरणच्या विरोधात दोन दिवसाचे धरणे आंदोलन चालू करण्यात आले. परिसरातील सर्व ट्रान्सफार्मर दुरुस्त करावे, बंद असलेल्या ट्रान्सफार्मर ऐवजी नवीन ट्रान्सफार्मर बसवावे. याच बरोबर अतिवृष्टी काळात पुरामुळे पडलेले विजेचे खांब बसविण्यात यावे त्याचबरोबर यातून झालेली शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी नायब तहसिलदार कार्यालया समोर हे आंदोलन  सुरु करण्यात आले. या आंदोलनात उपस्थितीत राहुन ह्या मागण्या प्रशासनाकडे लावून धरल्या. परिसरातील सर्व शेतकरी, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post