Top News

सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा.....Constitution Day celebrated with great enthusiasm at St. Paul's Academy Hiwarkhed.....

सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे संविधान दिवस मोठ्या  उत्साहात साजरा.....


विदर्भ माझा न्युज 24 - अकोला / हिवरखेड

हिवरखेड येथील स्थानिक सेंट पॉल अकॅडमी, हिवरखेड तर्फे दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी देशाचे संविधान निर्माते, बहुजन जननायक, राष्ट्रनिर्माणाचे अग्रगण्य धुरी, भारतरत्न  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी  निर्माण केलेल्या संविधानाबद्दल आदर निर्माण व्हावा व राष्ट्र त्या संविधानानुसार चालते ही भावना लोकांच्या मनात दृढ व्हावी यासाठी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.  

सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून  व संविधानाचं पूजन करून करण्यात आली.  प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन  कार्यक्रमाचे अध्यक्ष, शाळेचे प्राचार्य चंद्रकांत तिवारी यांनी केले.  

प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षीका गांधी, रवींद्र वसे आणि विमल येऊल उपस्थित होते. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी संविधानाबद्दल आपले विचार व्यक्त केले त्यानंतर दिगंबर बावणे  यांनी सुद्धा संविधानावर आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर  चैतन्य खारोडे  यांनी संविधानाबद्दल व बाबासाहेब आंबेडकर यांचा बद्दल व त्यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल अशी माहिती दिली  व सर्वात शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये सविधांनाचे असणारे महत्त्व व्यक्त सांगितले की संविधान हे कुंभाराच्या भूमिकेमध्ये आहे ते बाहेरून नागरिकांना जरीही कडक वाटत असले तरी आतून मात्र  देशातील नागरिकां बद्दल अत्यंत स्नेह,प्रेम व आदर ठेवणारे  आहे. 

आपल्यावर अन्याय झाला तर त्या संविधानानुसारच आपण न्यायालयामध्ये आपल्या अधिकारांबद्दल कोणाच्याही विरोधात संविधानिक पद्धतीने न्याय मागू शकतो. विद्यार्थ्यांनीसुद्धा राष्ट्र  निर्माणचेच काम  करावे असे आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले कार्यक्रमाला बहुसंख्य पालकांची उपस्थिती होती.

 या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटीया, उपाध्यक्ष लूणकरंनजी डागा, सचिव प्रमोद चांडक यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post