Top News

अल्ट्राटेक सिमेंटच्या विरोधातील आंदोलनास अ. भा. सरपंच परिषदेचा पाठिंबा. The agitation against Ultratech Cement a. Bh. Support of Sarpanch Parishad.

अल्ट्राटेक सिमेंटच्या विरोधातील आंदोलनास अ. भा. सरपंच परिषदेचा पाठिंबा.  


विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा



 कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी च्या विरोधात दत्तक ग्रामपंचायत चे धरणे आंदोलन व साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांनी पाठिंबा दिला आहे.

      या प्रसंगी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संघटनेचा पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सरपंचांना आणि ग्रामस्थांना जर अल्ट्रा टेक सिमेंट कंपनी अन्यायाची वागणूक देत असेल तर अखिल भारतीय सरपंच परिषद हे खपवून घेणार नाही. कंपनी ने लाईमसटोन ची जड वाहतूक करायची, दत्तक ग्राम पंचायत मध्ये प्रदुषण करायचं, कुठेही पर्यावरण मुक्त गाव ठेवण्यासाठी काम करायचं नाही, स्थानिक ग्राम पंचायत मधील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दयायचं नाही, कंपनी च्या उत्पन्नाच्या आधारित सि एस आर फंड दत्तक ग्राम पंचायत सरपंचांना विश्वासात घेऊन करायला पाहिजे ते पण कंपनी करत नाही, ज्या दत्तक गावांच्या भरवसावर ही कंपनी आवाळपुर येथे उभी राहिली आहे त्या अन्नदाता शेतकर्यांसाठी त्यांच्या पांदन रस्तासाठी ही कंपनी काहीच करत नाही. या कंपनी चे प्रदुषण, धुळ, दुषित पाणी, हवा, ध्वनी प्रदुषण, जळवाहतूक यामुळे अपघात, दमा, कॅन्सर, श्वसनाचे आजार अशा एक नाही अनेक समस्यांना स्थानिक ग्राम पंचायतींना आणि ग्रामस्थांना जावे लागते. कंत्राटी कामगार व पर्मनंट कामगार यामध्ये दुजाभाव केला जातो, हा दुजाभाव अखिल भारतीय सरपंच परिषद खपवून घेणार नाही असे सांगितले. जर आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत किंवा हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास फक्त चंद्रपूर जिल्ह्य़ातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर अधिक व्यापक आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. 

         या प्रसंगी प्रा. आशिष देरकर, रत्नाकर चटप, मेघा पेंदोर, प्रियंका दिवे, सुनीता तुमराम, संजना बोंडे, पुरुषोत्तम आस्वले, शालिनी बोंडे, ज्योती जेनेकर, अरुण रागीट, संगीता मडावी, ज्योती धोटे, बाळकृष्ण काकडे, अरुण काळे, आशाताई खासरे, मंगला गायकवाड, सुजाता चौधरी, सुनिता आत्राम, जयश्री ताकसांडे, सुषमा गेडाम, माया मडावी, संतोषी माहुलीकर, निर्मला मरसकोल्हे, ताईबाई लेडांगे, कुसुम संकुलवार, सविता घटे, अर्चना बोढे, तृप्ती गोहने, संतोष पोटे यासह अनेक सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Previous Post Next Post