जिल्हास्तरीय १४ वर्ष वयोगट व १७ वर्ष वयोगट रस्सीखेच स्पर्धामध्ये विश्व ज़्योती कांन्हेट स्कुल प्रथम
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
क्रिडा युवक सेवा संचालय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रिडा संघ चंद्रपुर च्या वतीने सर्वोदय महाविदयलय चंद्रपुर येथे १४ वर्षवयोगट मुले/मुली व १७ वर्ष वयोगट मुले/मुली या दोन्हीं गटातून नागभीड तालुक्यातील विश्व ज़्योती कांन्हेट स्कुल तळोधी बा. प्रथम विजेता ठरले असून त्यांची निवड नागपुर येथे २० आक्टोंबर २०२३ रोजी होणाऱ्या रस्सीखेच स्पर्धामध्ये झाली आहे.
जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धामध्ये जिल्यातुन ३५ शाळेमधील ३५० विदयाथ्थानी सहभाग नोंदविलेला होता.यामध्ये विश्व ज़्योती कांन्हेट स्कुल तळोधी बा चे ४० मुले /मुली सहभागी झाले होते. १४ वर्ष वयोगट मुलांचा अंतिम सामना पोद्दार कांन्हेट ब्रम्हपुरीचा पराभव करून विश्व ज़्योती कांन्हेट स्कुल तळोधी बा विजेते ठरले,१४ वर्ष वयोगट मुलीचा अंतीम सामना अनुसयाबाई पोशट्टीवार तळोधी बा.संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. तसेच १७ वर्षवयोगट मुले अंतिम सामना मध्ये इन्फंट जेसेस स्कुल राजुरा संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले, तर१७वयोगट मुली मध्ये अंतीम सामना श्री महर्षी विदया मंदिर चंद्रपुर संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. विश्व ज़्योती कांन्हेट चे क्रिडा शिक्षक प्रविण मोहुर्ले व रिंकु पिसे शिक्षिका यांनी नेतृत्व केले.१४ वर्ष वयोगट मुले/मुली व १७ वर्ष वयोगट मुले/मुली नी जिल्हा स्तरीय रस्सीखेच स्पर्धामध्ये प्रथम विजेतेपद पटकावून विभागीय स्तरावर निवड झाल्याने विश्व ज़्योती कांन्हेट स्कुल चे प्राचार्य सिस्टर्स ॲनिट जोश यांनी शाळेत विजेतेपद संघाचे पुष्प गुच्छे देऊन अंभिनंदन केले.तसेच विजेता संघाचे पालक वर्ग, शिक्षक व विदयार्थी वर्गाकडून कौतुक केले गेले.
