Top News

Rajura - Bamni road work has finally started - Rajura people have accepted thanks to Suraj Thackeray!

अखेर राजुरा - बामणी रस्त्याचे काम सुरु - राजूराच्या जनतेनी माणले सुरज ठाकरेंचे आभार!



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा


सुरज ठाकरे हे राजुरा विधानसभा क्षेत्रातील युवकांच्या गळ्यातले ताइत बनले  आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शासन व जनप्रतिनिधींना धारेवर धरून रस्त्यावर रोजगाराबाबतच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम सूरज ठाकरेंच्या माध्यमातून सतत सुरू आहे.

 राजुरा ते बामणी मार्गावर  दरवर्षी पावसाळ्यामध्ये पडत असलेले मोठ मोठे खड्डे  सुरजागड वाहतुकीमुळे रस्त्यावर पडलेली लाल माती पेट्रोल पंप च्या विरुद्ध दिशेने असलेले अवैध पार्किंग व्यवस्था अनेक अपघात झाले आहेत बऱ्याच लोकांना आपल्या जीवाला मुकावे लागले, परंतु या विरोधामध्ये फक्त सूरज ठाकरे हेच सतत आवाज उचलत असताना राजुराच्या जनतेने अनुभवले व बघितले आहे.

 या रस्त्या संदर्भातल्या तात्काळ काम सुरू करा अन्यथा आमरण उपोषण करतो असा प्रशासनाला इशारा देताच अखेर प्रशासन जागे होऊन या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

 जे आमदारांनी केले नाही ते सुरज ठाकरे ने केले असे त्यांचे समर्थक  म्हणत आहेत व स्थाधीक जनतेमध्ये तशी चर्चा रंगली आहे. राजुरातील युवावर्गाने व राजूराच्या सामान्य जनतेने याबाबत सुरज ठाकरे यांचे आभार मानले आहे.

Previous Post Next Post