उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील धक्कादायक प्रकार...
गर्भवती महिलेला औषधी देण्यास नकार देणाऱ्या परिचारिकेला तात्काळ निलंबित करा...आदिवासी टायगर सेनेची मागणी !
विदर्भ माझा न्युज 24 : राजुरा
राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे परिचारिकेने राजुरा येथील इंदिरानगर वार्डात वास्तव्यास असलेल्या एका गर्भवती महिलेला राजुरा येथील रहिवासी नसल्याचे कारण देत चक्क डॉक्टर ने लिहून दिलेली औषधी देण्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशी परत गरोधर महिला रुग्णालयात गेली असता तीच परिस्थिती बघून तिने राजुरा येथील सामाजिक कार्यकर्ते आदित्य भाके,अशोक राव व इतर काहीना मदत मागितली.
सदर गरोधर महिला उपचार घेण्यापासून वंचित राहिली असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या संतापजनक घटनेची गांभीर्याने दखल घेत आदिवासी टायगर सेने चे विदर्भ अध्यक्ष संतोष कुळमेथे यांनी त्या परिचारिकेला तात्काळ निलंबित करण्याची मागणी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कडे केली असल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली असून यामुळे त्या परिचारिकेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासन प्रकरणाची दखल घेत नसेल तर मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी टायगर सेनेच्या वतीने देण्यात आला.

