अडेगाव च्या सरपंच अपात्र घोषीत...
विदर्भ माझा न्युज 24 - झरी
झरी तालुक्यातील अडेगाव च्या महिला सरपंच यांच्यावर पदाचा दुरुपयोग आणि अनियमता याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी अमरावती विभागाचे अतिरीक्त अप्पर आयुक्त गजेंद्र बावणे यांनी सरपंच सीमा दत्ता लालसरे यांना अपात्र घोषीत केले.
उपसरपंच भास्कर सूर, अरुण हिवरकर, दिनेश ठाकरे, निर्मला पानघाटे, सविता असूतकर, माया हिवरकर, गंगा काटकर या सदस्यांनी सरपंच सीमा लालसरे यांच्या विरोधात अप्पर आयुक्त अमरावती यांचे कडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारी नुसार 29जून 2021रोजी ग्रामपंचायत अडेगाव येथील मासिक सभेत 11सदस्यांनी उपस्तित राहून हजेरी रजिस्टर 4ते 5 व इतिवृत्त विचार नोंद वहीत साक्षऱ्या केल्या होत्या. परंतु त्यानंतर सरपंचानी केलेली साक्षरी खोडून टाकली. याबाबद ची नोंद सचिवानी घेतली होती. याबाबद सरपंचानी कोणतेही सामाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही.
त्यामुळे सरपंच सीमा लालसरे यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचे दिसून आले होते. तसेच सरपंच यांनी आरसीपीएल मुकुटबन या कंपनी कडून कोविड -19प्रतिबंधनात्मक उपाय योजनेअंतर्गत 6मे 2021रोजी प्राप्त साहित्यांचे व नोंद घेण्यात आलेल्या साठ्यामध्ये मोठी तफावत दिसून अली.
याबाबद त्यांनी प्रकरणात आवश्यक पुरावे सादर केले नाही. त्यामुळे सर्व प्राप्त तथा उपलब्ध दस्तऐवजांच व परिस्थिचा विचार करत अप्पर आयुक्तांनी सरपंचांना अपात्र घोषीत केले..

