Top News

The gram sevak of the gram panchayat office at Gram Panchayat Murthy comes to the office in the afternoon... Many works in the village are stalled. Shiv Sena branch chief Suraj Nakkolwar's demand to take action against Gram Sevak...

ग्रामपंचायत मुर्ती येथील ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक कार्यालयात येतो दुपार नंतर......


गावातील अनेक कामे आहेत रखडलेली.......


ग्रामसेवकावर कार्यवाही करण्याची शिवसेना शाखा प्रमुख सुरज नक्कोलवार यांची मागणी......




विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा


राजुरा तालुक्यातील मोजा मुर्ती येथील ग्रामपंचायत कार्यालय येथील ग्रामसेवक हे दुपारी २.०० च्या नंतर येतात. तसेच फोन केले असता फोन सुद्धा उचलत नाही. त्यामुळे गावातील लोकांची अनेक कामे रखडलेली आहे. शासनामार्फत निघणा-या योजनेपासुन आज आमचे गावातील लोक वंचित आहे. कोणतेही शैक्षणिक काम होत नाही. दाखले, ठराव कॉपी, शासनामार्फत निघणा-या योजनेमध्ये आवश्यक असतात तरी दाखल्यासाठी अर्ज करून सुद्धा ग्रामसेवक वेळेवर देत नाहीत. आज गावामध्ये ग्रामसेवकाची नियुक्ती झाल्यापासुन कोणतेही नवीन काम झालेले नाही आहे. तरी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. असे निवेदणात तालुक्यातील मुर्ती येथील शिवसेना शाखा प्रमुख सुरज रमेश नक्कोलवार यांनी म्हटले आहे. ग्रामसेवकावर कार्यवाही न झाल्यास व गावकर्यांची समस्या न सुटल्यास शिवसेना स्टाईल आंदोलंन करण्यात येनार अल्याची माहीती सुरज नक्कोलवार यांनी दिली आहे.

Previous Post Next Post