स्मृती व्यवहारे यांना नाशीक येथे आयोजीत जीत अचल अधीवेशनात पुरस्कार देऊन करण्यात आले सन्मानित...
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
नाशीक येथे जीत अचल अधीवेशन 2023 दि.7ऑक्टोबर आणी 8 ऑक्टोबर ला पार पडले. सदर अधीवेशन नाशीक येथील स्वामीनारायण हॉल येथे आयोजीत केले होते.सदर अधीवेशन कार्यक्रमात अचल अध्यक्ष जे सी जितेंद्र बोरा प्रथम महिला जे सी श्रुती बोरा यांच्या हस्ते संपूर्ण वर्ष भर 2023 मध्ये अचल कार्यकारणी मध्ये झोन निर्देशक महिला अध्याय या पदावर अतिशय सुंदर कार्य केले असल्यामुळे जे सी स्मृती व्यवहारे यांना त्यांच्या उत्तम कार्यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दोन दिवसीय या अचल अधिवेशन मध्ये संपूर्ण जे सी आय झोन 13 चे जे सी परिवार सदस्य उपस्थित होते. सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याने स्मृती व्यवहारे यांनी या सन्मानाचे श्रेय अचल अध्यक्ष जितेंद्र बोरा, सौरभ बरडिया, अनुप गांधी, जयश्री शेंडे, पती पराग व्यवहारे, मुलगा श्रीपुष्प व्यवहारे, वडील राजेंद्र कोटकर, आई विजयालक्ष्मी कोटकर, संपूर्ण परिवार व जे सी सदयस्य यांना दीले. व सर्वांचे आभार व्यक्त केले.
