Top News

Organized Meri Mati Mera Desh and Ghar Chalo Abhiyan program at Kanhalgaon on behalf of BJP Korpana Taluka Mahila Aghadi.

भाजपा कोरपना तालुका महिला आघाडीच्या वतीने कान्हाळगाव येथे मेरी माटी मेरा देश व घर चलो अभियान कार्यक्रमाचे आयोजन।

 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना - ग्रामीण प्रतिनीधी, नितेश केराम  8698423828 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन कान्हाळगाव येथे भाजपा महिला आघाडीच्या वतीने मेरी माटी मेरा देश कार्यक्रम आणि घर चलो अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्का आत्राम प्रदेश महामंत्री तथा माझी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा, प्रमुख उपस्थिती विजया लक्ष्मी डोहे  जिल्हा महिला आघाडी महामंत्री,  नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष  कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष संजय गांधी निराधार योजना, अध्यक्ष जया धारणकर भाजपा नेत्या शोभा आगलावे, भाजपा नेत्या आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला गावातील महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन मोठ्या उत्साहात  मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमातील कलशात माती टाकून नमन केले तसेच घर चलो  अभियानाला मोठ्या संखेने सहभागी होऊन कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाला प्रतिभा पडोळे, आशावर्कर मंदाबाई टेकाम, अंगणवाडी सेविका विठाबाई बांदूरकर, भाजपा पदाधिकारी संगीता गेडाम, जोती कॉरासे, अनिता केराम, शांताबाई केराम, मंदा हिवरकर, सुनंदा मडावी, श्रद्धा येरेकार, मदतनीस आदी महिला पदाधिकारी तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post