Top News

Groundbreaking of closed drain constructions by enterprising Sarpanch Nandkishore Wadhai at Nimbala.

निंबाळा येथे उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढईंच्या हस्ते बंदिस्त नाली बांधकामांचे भुमिपुजन. 



विदर्भ माझा न्युज 24 -  राजुरा 


 ग्रामपंचायत कळमना अंतर्गत मौजा निंबाळा येथे नक्षलग्रस्त निधी अंतर्गत बंदिस्त नाली बांधकामांचे भुमिपुजन कळमनाचे उपक्रमशील सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायत कळमना अंतर्गत मौजा निंबाळा येथे नक्षलग्रस्त निधी उपलब्ध करून विकासकाम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मौजा निंबाळा हा स्वच्छ, सुंदर, हिरवगार, पर्यावरणमय आणि पायाभूत सुविधा संपन्न करण्याचा आपला प्रयत्न आहे. येणाऱ्या काळात येथे आवश्यक सेवासुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. 

        या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दिपक झाडे, ह.भ.प. रामदास महाराज भोयर, जेष्ठ नागरिक महादेव पाटील मेश्राम, पोलीस पाटील गोपाल पाल, ग्रामसेवक मरापे, भिवसन मोटघरे, नामदेव देवाळकर, दौलत मोटघरे, रावजी गौरकार, निलकंठ मोटघरे, मधुकर पेदोंर, शंकर मेश्राम, निलकंठ घाटे, मुरलीधर पेंदोर, राजेश देवाळकर, अमोल उरकुडे, श्रावण गेडाम, शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे यासह समस्त गावकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post