पंचायत समिती कोरपना अंतर्गत अमृत महा आवास योजना 3.0 उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लाभार्थ्यांचा सत्कार ।
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना - ग्रामीण प्रतिनीधी, नितेश केराम 8698423828
कोरपना आज दि. 3/10/2023 रोजी पं. स. कोरपना अंतर्गत अमृत महा आवास योजना 3.0 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लाभार्थ्यांना ग्राम पंचायत यांना गट विकास अधिकारी पं. स. कोरपना यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अपूर्ण असलेले लाभार्थ्यांचे मेळावा घेऊन अपूर्ण घरकुल तात्काळ लवकरात लवकर पूर्ण करण्या बाबत सूचना देण्यात आल्या. या वेळी गट विकास अधिकारी पं. स. कोरपना विजय पेंदाम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच सदर सभेत घरकुल विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
