Top News

On the 21st commemoration day of Martyr Dnyaneshwar Ade, circle residents paid tributes....

शहीद ज्ञानेश्वर आडे यांचा २१ वा स्मृतिदिनी सर्कल वासीयांनी दिली मानवंदना....

                   


     

विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी



आर्णी तालुक्यातील सावळी सर्कलमधील मौजा कृष्णनगर येथील शहीद ज्ञानेश्वर यांचा २१वा स्मृतिदिन आज साजरा करण्यात आला सर्वप्रथम यावेळी जिल्हा परिषद शाळा कृष्णनगर येथील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून शहीद ज्ञानेश्वर गोविंदा आडे व शहीद साहेबराव चव्हाण अमर रहे अमर रहे अशा घोषणा देत शहीद ज्ञानेश्वर आडे यांच्या स्मृतिस्थळा जवळील कार्यक्रमाला उपस्थित झाले परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शहीद ज्ञानेश्वर आडे यांच्यातील चित्राचे पूजन करून राष्ट्रगीत झाले देशासाठी शहीद झालेल्या या दोन्ही शहीद वीर जवानांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो आणि देशासाठी शहीद झालेल्या या दोन्ही शहीद वीरांचे आदर्श शालेय विद्यार्थ्यांनी घ्यावेत या गावांमधून अशीच वीर घडो आणि आपल्या गावाचे नाव लौकीक सोनेरी अक्षरात राहो. 



उपस्थित मान्यवरांनी सगळ्यांनी पुष्पहार ठेवून मानवंदना केली  शाळेच्या विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप सुद्धा करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित जितेंद्र शिवाजीराव मोघे, वीरपत्नी कुंती ज्ञानेश्वर आडे, चौकीचे सहाय्यक निरिक्षक सांदिप बारींगे, बाळासाहेब शिंदे पाटील, सरंपच मुबारक तंवर, प्रकाश  राठोड, विजय राऊत, प्रल्हाद पाटील, जगताप नुनेश्वर, गोविंदा आडे, दुलसिग चव्हाण,किसन चव्हाण, इंदल महाराज, राम पवार, अविनाश चव्हाण, रुपेश खरतडे, योगेश शिवणकर, दुर्गेश कर्णेवार सर्व पत्रकार


तथा उषा मेश्राम,सरपंचा सुनीताबाई जाधव, उपसरपंच अमोल जगताप, सचिव सर्व ग्रामपंचायत सदस्य पदअधिकारी जिल्हा परिषद मराठी शाळा कृष्णनगर शिक्षक वृंदासह कृष्णनगर गावातील तथा सावळी सदोबा परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Previous Post Next Post