राजुरा येथील सौ. राधा विरमलवार ठरल्या क्विन ऑफ चंद्रपूर 2023 च्या विजेत्या....
हरीष शर्मा व शुभांगी हरीष शर्मा याच्या हस्ते केले पुरस्कार वितरन....
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
रॉकस्टार संस्थे तर्फे आयोजित प्रियदर्शिनी सभागृह, चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या क्वीन ऍंड प्रिन्स स्पर्धेत राजुरा शहरातील पेरी बेकरस च्या संचालिका सौ. राधा प्रणय विरमलवार या मिसेस क्वीन ऑफ चंद्रपूर 2023 च्या विजेत्या ठरल्या त्याच बरोबर मोस्ट स्टायलीश लूक या अवार्डने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
या यशासाठी त्यांचेवर शहरात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामध्ये सौ. राधा प्रणय विरमलवार यांचे पती श्री. प्रणय विरमलवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
रॉकस्टार ग्रुपच्या माध्यमातून आयोजित फॅशन शो कार्यक्रमात बल्हारशाह नगर परीषद चे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा ग्रामिण जिल्हा अध्यक्ष हरीष शर्मा व शुभांगी हरीष शर्मा यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून पुरस्कार वितरण केले आणि उपस्थितांशी संवाद साधला.



