तहसील कार्यालय कोरपना येथे संजय गांधी निराधार योजनेची बैठक संपन्न...
विदर्भ माझा न्युज 24 - नितेश केराम, ग्रामीण प्रतिनिधी कोरपना
संजय गांधी विधवा निराधार, श्रावणबाळ योजना व इतर योजनेतील पात्र व गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवुण देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु नारायण हिवरकर संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष कोरपना तहसील कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीचे आयोजन दि 17:10:2023 रोज मंगळवार ला आयोजित करण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी नारायण हिवरकर संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष होते तर प्रमुख उपस्थिती चिडे नायब तहसीलदार, मनोहर कुळसंगे,अरविंद डोहे, लक्ष्मीबाई कुळमिथे, नारायण राठोड,पंचायत समिती अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
नारायण हिवरकर संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात करण्यात आली बैठकीत साधक भादक चर्चा करण्यात आली या बैठकीत 112 प्रकरणे ठेवण्यात आले व पुर्ण 112 प्रकलनांना मंजुरी देण्यात आली नारायण हिवरकर यांनी संजय गांधी निराधार,श्रावणबाळ योजना व इतर योजनेतील पात्र व गरजू लाभार्थ्यांनी पुढे येऊन फार्म भरावे काही अडचणी आल्यास आम्ही त्या पात्र लाभार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करु व या योजनेचा लाभ मिळवुण देऊ असे आवाहन केले बैठकीला ढोबळे , मालेकर ,सलीम भाई, कुळमिथे आदी कर्मचार्यांनी मोलाचे सहकार्य केले.
