Top News

Inauguration ceremony of four e-hour trains given to Nagbhid Nagar Parishad by ICIC Bank and ICIC Foundation was completed....

नागभीड नगर परिषदेला ICIC बॅंक व ICIC फाउंडेशन तर्फे देण्यात आलेल्या चार ई-घंटागाडी चा लोकार्पण सोहळा संपन्न....




विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड

आयसी.आयसी.आय. बँक व आयसी.आयसी.आय. फांउडेशन तर्फे देण्यात आलेल्या चार ई-घंटागाडी यांचा लोकार्पण सोहळा दिनांक १७/१०/२०२३ रोज मंगळवार ला नगर परिषद कार्यालयात पार पाडण्यात आला.

 सदर कार्यक्रमा अंतर्गत आयसी.आयसी.आय. शाखा ब्रम्हपुरीचे बँक मॅनेजर रुपेश पाटील, आयसी.आयसी.आय. फाउंडेशनचे झोनल हेड दीपक पाटील, आयसी.आयसी.आय. फाउंडेशन चे प्रोजेक्ट मॅनेजर नवीन कपूर, डेव्हलपमेंट ऑफिसर गिरीश निर्वाण, मोनिष गोडबोले, रीता हटवार, प्रकाश पांडे, CF सदानंद भाकरे यांचा नगर परीषद सभागृहात नगर परिषद नागभीडचे प्रशासक तथा मुख्याधिकारी  राहुल कंकाळ यांचे हस्ते स्वागत करण्यात आले. 



 तद्वनंतर आयसी.आयसी‌.आय. शाखा ब्रम्हपुरीचे बँक मॅनेजर रुपेश पाटील यांचे कडून नगर परिषद प्रांगणात चार ई-घंटागाडीचे पूजन करून श्रीफळ फोडून सदर ई-घंटागाडी यांची चावी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांचे कडे सुपूर्द करून हस्तांतरण करण्यात आले.

          सदर कार्यक्रमास आयसी.आयसी.आय. बँक व आयसी.आयसी.आय. फांउडेशन अधिकारी/कर्मचारी तथा नगर परिषद चे अधिकारी/कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी वर्ग व इतर नागरिक उपस्थित होते .

Previous Post Next Post