जिल्ह्यातील विद्यार्थी या खेळाच्या माध्यमातून मेहनत घेऊन आपल्या जिल्ह्याचं नावलौकिक करेल व याकरिता सुधीर मुनगंटीवार हे आपल्या सोबत खंबीरपणे उभे राहतील - चंदनसिंह चंदेल
३ री चंद्रपुर जिल्हास्तरीय आष्टेडू मर्दाणी आखाडा तथा राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा-२०२३ बल्हारशाह तालुका क्रिडा संकुल विसापूर येथे शुभारंभ....
👉🏻हे ही वाचा......📌पुरातन मंदिर आपली ओळख शोधतोय !
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
चंद्रपूर जिल्हा आष्टेडू मर्दाणी आखाडा, बल्हारशाह आष्टेडू मर्दाणी आखाडा असो. तर्फे ३ री चंद्रपुर जिल्हास्तरीय आष्टेडू मर्दाणी आखाडा तथा राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा-२०२३ महाराष्ट्रा चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व वंदन करून चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख अध्यक्षीय उपस्थितीत दि.८/९/२०२३ रोज शुक्रवार ला बल्हारशाह तालुका क्रिडा संकुल विसापूर येथे शुभारंभ झाला.
👉🏻हे ही वाचा......📌पुरातन मंदिर आपली ओळख शोधतोय !या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने म्हणून इंजि. देवेंद्र वाटकर भाजपा शहर सचिव तथा अध्यक्ष बेरोजगार अभियंता असो. चंद्रपूर जिल्हा, गणेश लांजेवार जिल्हा सचिव, गुलाम अहमद मेहबूब शेख बल्हारशाह तालुका अध्यक्ष, प्रशांत पिंपळे बल्हारशाह तालुका उपाध्यक्ष मंचावर उपस्थित होते.
👉🏻हे ही वाचा......📌पुरातन मंदिर आपली ओळख शोधतोय !
या प्रसंगी चंदनसिंह चंदेल यांनी आजच्या या बदलत्या अत्याधुनिक युगात आपली संस्कृती व पारंपारिक खेळ आणि कला जपुन त्याला अंगीकृत करून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवुन आणण्याकरिता महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून सुरू असलेले आखाडे आणि त्या आखाड्यात शिकविले जाणारे पारंपारिक खेळ हे राज्यस्तरीय शालेय शिक्षणात समाविष्ट केले आहे.
👉🏻हे ही वाचा......📌पुरातन मंदिर आपली ओळख शोधतोय !
👉🏻हे ही वाचा......📌पुरातन मंदिर आपली ओळख शोधतोय !हे पाऊल विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासात मोठ्या योगदानाचे ठरणार आहे. या मुळे नवीन पिढीला आपली संस्कृती आणि कला याची माहिती होऊन त्याबद्दल आवड व संघटनात्मक प्रेम निर्माण होईल. यातून एक अत्यंत प्रबळ,स्वस्थ समाज घडविण्यात मोठं यश येईल. मला आनंद आहे आज या स्पर्धेत मुलींची संख्या मोठया प्रमाणात आहे. यातुन मुली आत्मरक्षणाचे धडे मेहनत घेऊन सहज अंगीकृत करू शकतात जे त्यांना भविष्यात मदत करेल. 👉🏻हे ही वाचा......📌पुरातन मंदिर आपली ओळख शोधतोय !
आज आपण ज्या प्रांगणात व भव्य वास्तु मध्ये हि स्पर्धा आयोजित केली आहे हे सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पकतेने व प्रयत्नाने साध्य झाले आहे. त्यांनी सदैव विकासाला प्राधान्य देऊन समाजातील प्रत्येक घटकाकरिता आपला जिवन अर्पण करून दिले आहे. मला विश्वास आहे चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी या खेळाच्या माध्यमातून मेहनत घेऊन आपल्या जिल्ह्याचं नावलौकिक करेल व याकरिता सुधीर मुनगंटीवार हे आपल्या सोबत खंबीरपणे उभे राहणार असे मत चंदनसिंह चंदेल यांनी व्यक्त केले. 👉🏻हे ही वाचा......📌पुरातन मंदिर आपली ओळख शोधतोय !
या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून व अन्य जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत अत्यंत ऊर्जेने भाग घेतला व आयोजित स्पर्धा यशस्वी केली. यात शिवकला, मर्दाणी कला,हस्तकला,पद संतुलन हे खेळ प्रकार समाविष्ट होते. या स्पर्धेच्या आयोजकांना तसेच उपस्थित प्रत्येक खेळाडूला चंदनसिंह चंदेल यांनी भविष्याच्या वाटचाली करीत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिंधु कुशवाह यांनी केले व आभार प्रदर्शन गुलाम अहमद यांनी केले.


