Top News

Mahatma Gandhi Vidyalaya Sonurli (Forest) Vidyalaya in Korpana Taluka Science Drama Selection for District Level!

कोरपना तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली(वन) विद्यालयातील विज्ञान नाटकाची जिल्हास्तरासाठी निवड !


👉🏻हे ही वाचा......📌पुरातन मंदिर आपली ओळख शोधतोय !

 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना : दिपक चिवाने ग्रामीण   प्रतिनिधी : मो.न. 9096181496 

नेहरू विज्ञान केंद्र मुंबई आणि शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव 2023-24 चे तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन दिनांक 08/09/2023 रोजी पंचायत समिती सभागृह कोरपणा येथे करण्यात आले होते.

👉🏻हे ही वाचा......📌पुरातन मंदिर आपली ओळख शोधतोय !

या नाट्योत्सवाचा मुख्य विषय होता मानव कल्याणासाठी "विज्ञान व तंत्रज्ञान" या नाट्योत्सवात् कोरपणा तालुक्यातील 18 शाळांनी भाग घेतला होता. त्यापैकी महात्मा गांधी विद्यालय (वन) चे समाजातील अंधश्रद्धेवर आधारित नाटकाने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकवीला व कोरपना तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी जिल्हास्तरावर आपले स्थान प्राप्त केले आहे. कार्यक्रमाला पंचायत समिती शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. 👉🏻हे ही वाचा......📌पुरातन मंदिर आपली ओळख शोधतोय !

 यावेळी प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक विज्ञान शिक्षिका कुरेशी  यांचे गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे सचिव गोरे ,शाळेचे मुख्याध्यापक हनुमंते  व इतर शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post